Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

जीआयआयएस मध्‍ये राष्‍ट्रीय विज्ञान दिन साजरा 

पुणे :ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कूल (जीआयआयएस) हडपसर कॅम्‍पसने विद्यार्थ्‍यांना आपल्‍या जीवनामध्‍ये विज्ञानाचे महत्त्व व मूल्‍याबाबत जागरूक करत राष्‍ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. विद्यार्थ्‍यांना विज्ञानाचे विविध सिद्धांत समजण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍यासाठी आणि विज्ञानाप्रती रूची निर्माण करण्‍यासाठी हा दिवस आयोजित केला जातो. विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्‍याचा याचा उद्देश आहे.

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्‍त्रज्ञ सर सी. व्‍ही. रमण यांनी रमण इफेक्‍टचा शोध लावल्‍याबद्दल दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्‍ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधासाठी सर सी. व्‍ही. रमण यांचा १९३० मध्‍ये भौतिकशास्‍त्रातील नोबेल पारितोषिकसह सन्‍मान करण्‍यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. विद्यार्थ्‍यांना या दिवसाचे महत्त्व सांगण्‍यात आले.

मास्‍टर श्रीहन देसाई (इयत्ता ८वी), कुमारी गोरोचना सिंग राव व कुमारी भूवी बोंडे (इयत्ता ६वी) यांनी डॉ. सी. व्‍ही. रमण व त्‍यांच्‍या शोधाबाबत सविस्‍तर माहिती सांगितली. या सत्रादरम्‍यान विद्यार्थ्‍यांना डॉ. सी. व्‍ही. रमण यांचे जीवन व कार्य आणि रमण इफेक्‍ट यावर आधारित सविस्‍तर माहितीपट देखील दाखवण्‍यात आला. विद्यार्थ्‍यांनी सक्रियपणे सहभाग घेत त्‍यांची मते व्‍यक्‍त केली आणि त्‍यासंदर्भात त्‍यांच्‍या शंका देखील विचारल्‍या.

विद्यार्थ्‍यांनी प्रयोगांमध्‍ये देखील सहभाग घेतला, ज्‍यामध्‍ये दाखवण्‍यात आले की ज्‍वलनासाठी, तुरटीचा उपयोग करून गढूळ पाणी शुद्ध करण्‍यासाठी आणि आम्‍ल व क्षारमधील अभिक्रिया समजण्‍यासाठी ऑक्सिजनची गरज असते. या कार्यक्रमामध्‍ये क्विझ स्‍पर्धा देखील होती, ज्‍यामध्‍ये इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंततच्‍या विद्यार्थ्‍यांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला. त्‍यांनी पुरस्‍कार जिंकण्‍यासोबत सर्व शिक्षकांची मने देखील जिंकली. या उदयोन्‍मुख शास्‍त्रज्ञांचा उत्‍साह पाहून शिक्षक अचंबित झाले.

याप्रसंगी ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल म्‍हणाले, ”दैनंदिन जीवनासाठी उपाययोजनांची निर्मिती करण्‍यापासून विश्‍वातील रहस्‍यांचा उलगडा करण्‍यापर्यंत विज्ञान मानवी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मानवी जीवनाच्‍या सर्व क्षेत्रांमध्‍ये विकास करण्‍यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान एकत्रितपणे काम करतात. आमच्‍या ९ जेम्‍स अध्‍यापन पद्धतीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही अनोख्या अध्‍यापन पद्धतीसह सर्वोत्तम सरावांचा समावेश असलेला अभ्‍यासक्रम देण्‍यावर भर देत सर्वोत्तम शिक्षण देण्‍याची खात्री करतो. आपल्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये विज्ञानाच्‍या महत्त्वाबाबत संदेशाचा प्रसार करण्‍याचा हा दिवस साजरा करण्‍यामागील मुख्‍य उद्देश आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading