Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

इच्छुकांची बॅनरबाजी पाण्यात,पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पालिकेकडून स्वच्छता…

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची दावेदारी करण्यासाठी शेकडो इच्छुकांनी शहरभर चौकाचौकात फ्लेक्‍स आणि बॅनरबाजी केली आहे. मात्र, ही बॅनर आता कचऱ्यात जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे महापालिकेने या अनधिकृत जाहिराती तसेच प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे इच्छुकांचा खर्च पाण्यात जाणार असला, तरी या फ्लेक्‍समुळे विद्रुपीकरण एका दिवसासाठी का होईना, पण कमी होणार आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात पुणे मेट्रोसह, विविध उद्‌घाटने तसेच अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहेत. त्यानिमित्त शहरात महापालिकेने पंतप्रधानांच्या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, संपूर्ण शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स तसेच जाहिराती काढण्यास सुरूवात केली आहे. तसेच पुढील काही दिवस ही मोहीम कायम ठेवली जाणार आहे. प्रभागातील कार्यक्रम तसेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरभर अनेक इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍सबाजी केली आहे. हे सर्व फ्लेक्‍स काढण्यात येत असल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading