fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

११ मार्चला चित्रपटगृहांमध्ये ‘एक नंबर… सुपर’ची धमाल!

तमाम रसिकांना भावेल असा मनोरंजनाचा सुपर फॅार्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कवडे ‘टकाटक’च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा एक नवी कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही कहाणी साधी सुधी नसून, ‘एक नंबर… सुपर’ आहे. कारण मिलिंद कवडेंच्या आगामी चित्रपटाचं शीर्षकच ‘एक नंबर… सुपर’ असं काहीसं सुपरहिट वाटावं असं आहे. ‘बाबूराव…’ आणि ‘तुकडे तुकडे…’ या गाण्यांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. टिझर, ट्रेलर आणि गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेहमीच प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिलिंद यांनी ‘एक नंबर… सुपर’ या चित्रपटातही तीच परंपरा कायम राखत लेखन-दिग्दर्शनासोबतच निर्मितीचीही धुरा सांभाळत एक नवं पाऊल टाकलं आहे. महेश शिवाजी धुमाळ आणि जितेंद्र शिवाजी धुमाळ यांच्या साथीनं मिलिंद यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं ‘एक नंबर… सुपर’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मिलिंदनं पुन्हा एकदा काही जुन्या सवंगड्यांना सोबत घेऊन, तर काही नवोदितांना साथीला घेऊन नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याचं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा हुकूमी एक्का मानला जाणारा प्रथमेश परब ‘टकाटक’च्या यशानंतर पुन्हा मिलिंद यांच्या ‘एक नंबर… सुपर’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दोन्ही गाण्यांतील प्रथमेशचा परफॅार्मंस प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. आता प्रत्यक्ष सिनेमाच्या माध्यमातून प्रथमेश रसिकांच्या मनावर गारुड करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एक नंबर… सुपर’ या टायटलवरून चित्रपटाच्या कथानकाचा जराही अंदाज लावता येत नाही. त्यामुळंच दिवसागणिक या चित्रपटाची उत्सुकता अधिकाधिक वाढत आहे. विनोदी अंगानं भाष्य करणारं कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा उत्तम अभिनय हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी ओळख, मुख्य कलाकारांच्या साथीला सहकलाकारांची लक्षवेधी कॅरेक्टर्स, कथेच्या प्रवाहाशी एकरूप होऊन मनोरंजन करणारी गाणी, अर्थपूर्ण शब्दरचना, मनमोहक संगीतरचना, उत्कंठावर्धक पटकथा लेखन, मनाला भिडणारं संवादलेखन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या साथीनं दिग्दर्शित केलेला एक उत्तम सिनेमा असं ‘एक नंबर… सुपर’चं वर्णन करता येईल.

या चित्रपटात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच या चित्रपटची कथा-पटकथा लिहिणारे मिलिंद म्हणाले की, ‘एक नंबर… सुपर’च्या माध्यमातून आम्ही एक परीपूर्ण मनोरंजक चित्रपट बनवला आहे. चहूबाजूंनी प्रेक्षकांना मनोरंजनाची जणू मेजवानी असलेला हा चित्रपट प्रेक्षकही सर्वार्थानं ‘एक नंबर… सुपर’ ठरवतील अशी आशा आहे. माझ्या आजवरच्या चित्रपटांप्रमाणेच विनोदाच्या सहाय्यानं एक महत्त्वपूर्ण विचार समाज आणि जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट करेल अशी आशाही मिलिंद यांनी व्यक्त केली. संजय नवगिरे यांनी या चित्रपटाचं संवादलेखन केलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे, तर संकलनाची बाजू प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे. पटकथा सहाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिलं असून, डिओपी हजरत शेख (वली) यांच्या अनोख्या सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading