Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाच्या काळात पोलीस, डॉक्टर, सफाई कामगारांचे योगदान प्रेरणादायी

पुणे : सामाजिक जाणिवेतून कोव्हिड – १९ च्या काळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला सफाई कामगार, डॉक्टर आणि पोलीस महिला यांना पुरस्कार देवून त्यांचा सन्मान अण्णा भाऊ साठे सभागृह पद्मावती या ठिकाणी नुकताच करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, नक्षत्रच्या अनुराधा तुम्मा, गणेश तुम्मा, उद्योजक इंद्रजित खोमणे, नीता कुदळे, रश्मी भटनागर, मनीषा गव्हाणे,गौरव व्यास, पौर्णिमा गोळे,संगीता गोरड आणि आयोजक निलम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी डॉ. तेजस्वी भाले तर अल्पना रणदिवे, सविता नायिकबरे, इंदू गायकवाड, सुजाता बनसोडे, नीलम सोलंकी या सफाई कामगार यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणाल्या की कोव्हिड – १९ च्या काळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला सफाई कामगार, डॉक्टर आणि पोलीस महिला यांना पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटला. कोरोनाच्या काळात पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार यांनी केलेले काम कौतुकास्पद असून प्रेरणादायी आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केले आहे.

निलम शेलार म्हणाल्या की कोव्हीडच्या काळात फ्रंटलाईन वर्कर यांनी केलेले कार्याचा सन्मान करताना आम्हाला त्यांचा आदर वाटतोय. यावेळी फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांपासून ते मिस व मिसेस यांनी सहभाग घेतला होता. तर या शोचे म्हणून ज्युरी प्रियंका मिसाळ, प्रसाद खरे, योगेश पवार यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading