Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

महापालिका निवडणुका जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली – चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका भाजपच्या वतीने शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

पुणे शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीत पाटील बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी शहर भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बूथस्तरापर्यंतच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणुक व्यवस्थापन समितीची लवकरच रचना पूर्ण करण्यात येईल. जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास वाटतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading