माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला वांद्रे पोलीसांकडून अटक
मुंबई : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि वाद हे नेहमीचेच आहे. आज दुपारी वांद्रे पोलीसां कडून विनोद कांबळी यांना बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली. अन् नंतर जामिनावर सुटकाही करण्यात आली.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा क्रिकेट पेक्षा जास्त वादामुळे चर्चेत. आज ही असाच घडलं आहे. आज दुपारी विनोद कांबळी यांनी स्वतः राहत असलेल्या गेटवरच बेदारकपणे गाडी चालवून कार सोसायटीच्या गेटला धडकवली. इतकेच नव्हे तर यावेळी विनोद कांबळी यांनी सोसायतीचा वॉचमन आणि रहिवाशांबरोबर वाद घातला. या प्रकरणीच कांबळी यांना अटक करण्यात आली. आज दुपारी त्यांना अटक करण्यात आली अन् जामिनावर सोडण्यातही आले. विनोद कांबळीवर आयपीसीचं कलम 279, कलम 336 आणि कलम 427 या कलमांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.
Former India cricketer Vinod Kambli arrested for ramming his car into gate of his residential society in Mumbai's Bandra, released on bail later: Police
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2022