Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजपने मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं, पण सरकार मात्र राजीनामा घेत नाहिये. त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आणखी तीव्र आंदोलन करु. राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

नवाब मलिक यांचे 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत. ‘ईडी’ने अटक करुनही ते राजीनामा देत नाहित. त्यावर हे सरकार त्यांना पाठिंबा देतय. त्यामुळे हे बॉम्बस्फोटातील आरोपींना समर्थन देतायत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून परत संभाजी राजे उपोषणाला बसले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्यांना तुम्ही उपोषणासाठी बसण्याची परवानगी का देत नाही,असे पाटील म्हणाले.

शिवसेनेने संजय राठोडचा राजीनामा घेतला, अनिल देशमुखांचा राष्ट्रवादीकडून घेण्यात आला मग मलिकांचा का नाही. शिवसेनेने याचा विचार करावा, असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला.
भाजपचे नेते हे महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असे सारखे सांगत आहेत. त्यावर अजित पवार सकाळी म्हणाले, शरद पवार, सोनिया गांधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असेपर्यंत हे सरकार पडणार नाही. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते ज्या मेट्रो स्टेशनला भेट देणार आहेत त्या मेट्रो स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मुंबईला आणि पुढे दिल्लीला पाठवण्यात आलीय, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकार व भाजपमध्ये वाद सुरू आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करु, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading