Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मला राज्याच्या विकासात रस आहे; मग आता मी काय तुरुंगात जाऊ? अजित पवार यांचा किरीट सोमय्याना सवाल

पुणे : किरीट सोमय्या यांनी ‘डर्टी डझन’ यादी जाहिर केली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार याच नाव ही होतं. यावर कायद्याने नियमाने जी कारवाई व्हायची ती होईल. मला राज्याच्या विकासात रस आहे. मग आता मी काय तुरुंगात जाऊ का?असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला.

आज अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संभाजी राजे मराठा आरक्षणासाठी परत उपोषणाला बसले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर एक बैठक घेतली. संभाजीराजे बाहेर असल्याने त्याचा संपर्क होऊ शकला नाही. पण चर्चेतून मार्ग निघतो. असे पवार म्हणाले.

युक्रेन आणि रशिया मध्ये महायुद्ध सुरू आहे. त्यामुळे १२०० ते दोन हजार लोक युक्रेनमध्ये असल्याचे माहिती आहे. त्याची सगळी माहिती मिळाली आहे. ३६६ पालकांना संपर्क अन बोलणं सुरू आहे.  त्याच्याशी बोलणं नियंत्रण कक्षामार्फत सुरू आहे. त्यांना मोबाईल नंबर ई मेल दिलेले आहेत. काही जण आज मुबईत पोहचत आहेत. मुख्यमंत्री अन आम्ही लक्ष देऊन आहोत. युद्धजन्य परिस्थिती असल्याने आपले नागरिक आणायचा प्रयत्न सुरू आहे.सरकारच त्यांना आणण्याचा खर्च करत उगाच गैरसमज पसरवू नये. असे आवाहन अजित पवार यांनी केले.

महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या तरी ओबीसी समाजाला आरक्षण अजून भेटले नाही . ओबीसी समाज परत आक्रमक झाला आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर निवडणुक घ्या अस आम्ही सर्वांनी निवडणुक आयोगाला सांगितले आहे. कारण त्या समाजाला नेतृत्व मिळाला पाहिजे. त्यामुळे ओबीसी आरक्षण निकाल लवकरचं त्याचा निकाल लागेल मग निवडणुका घेतील, असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading