fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

OBC Reservation : पुण्यात काँग्रेस-ओबीसी आंदोलकांमध्ये जोरदार हाणामारी

पुणे : पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस आणि ओबीसी कार्यकर्ते एकमेकांसोबत  भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अचानक ओबीसी समाजातील कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे एकमेकांमध्ये भिडले. एवढेच नव्हे तर, आंदोलना दरम्यान, ओबीसी कार्यकर्त्या मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्यालयात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेस मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केला. तसेच काळा झेंडा दाखवत निषेध व्यक्त केला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि ढोले पाटील यांच्यात धक्काबुकी झाली. ढोले पाटील या ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहेत. मात्र, ओबीसींच्या आरक्षणासाठी काँग्रेसनेच आयोजित केलेल्या आंदोलनात विजय वड्डेटीवार यांच्या नावाने घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे कॉंग्रेस आणि काँग्रेसच्या ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये एकमत राहिले नाही हे उघडा झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading