Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी कमिटी आक्रमक

पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या तरी सरकारने ओबीसी समाजाला पूर्णपणे आरक्षण दिले नाही. राज्य सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण द्यावे. तसेच ओ.बी.सी. समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या वतीने आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामोर्चा काढण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी.समाजाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे, सुनील पंडित, राधिका मखमाले, पुणे शहरातील ओ.बी.सी.समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाच्या वेळी केंद्र सरकारने ओबीसी समाजला आरक्षण दिले नाही. म्हणून केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.

रमेश बागवे म्हणाले, ओबीसी समाजाकडे केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी समाजाला पूर्णपणे आरक्षण मिळाले पाहिजे. मागासवर्गीय आयोगाने ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भरपूर प्रयत्न केले. केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली पाहिजे. ओबीसी समाजाला एम्पिरिकल डेटा देऊन समाजाच्या विविध मागण्या ओबीसी समाजाला आरक्षण दिले पाहिजे. यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत.

प्रशांत सुरसे म्हणाले, ओबीसी समाजाला लवकरात लवकर आरक्षण भेटेल, असे विजय वडेट्टीवार
मनात आहे. पण ओबीसी समाजाला अजूनही आरक्षण भेटले नाही. केंद्र सरकारला ओबीसी समाजाचा विसर पडला काय? येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांपूर्वी आम्हाला आरक्षण भेटलेच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आज आम्ही मोर्चा काढत आहोत.

संबंधीत बातमी :

OBC Reservation : पुण्यात काँग्रेस-ओबीसी आंदोलकांमध्ये जोरदार हाणामारी https://maharashtralokmanch.com/2022/02/22/obc-reservation-violent-clashes-between-congress-and-obc-agitators-in-pune/

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading