Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

उत्तर प्रदेशातील ऊसतोड कामगारांना त्यांना त्यांच्या गावात सोडावे – मेधा पाटकर

कामगार आयुक्तांना दिले निवेदन

पुणे : ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय व कायद्यांच्या उल्लंघनाबाबत आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज कामगार आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांच्या विविध प्रश्नां विषयी निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मेधा पाटकर म्हणाल्या, ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय हा वाढत आहे. तो कमी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऊसतोड कामगार हे उत्तर प्रदेश व बाहेरच्या गावावरून येत असतात. त्याचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्याना टाळे बंदीच्या काळात उत्तर प्रदेश येथून आणले गेले. त्यातील छोट्या गावातून त्याना अजूनही आणण्यात येत आहे. त्यांना ज्या गावातून आणले आहे. त्याच्या गावात सोडावे, अशी विनंती आज आम्ही कामगार आयुक्ता व मंत्रालयातल्या अधिकार्‍यांकडे केली आहे.

Leave a Reply