fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे शहरातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे : महापालिकेकडून येत्या गुरुवारी रोजी लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील सोमवार पेठ, नरपतगीरी चौक ते 15 ऑगस्ट चौक दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण लाईनचे तसेच लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जल नलिकेचे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
तसेच शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :
लष्कर जलकेंद्रअंतर्गत जलमंदिर झोन मधील संपूर्ण परिसर :- GE साउथ, GE नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड परिसर, कोरेगाव पार्कचा संपूर्ण भाग, पुणे स्टेशन परिसर, ससून हॉस्पिटल परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, गणेशखिंड रोड व परिसर, पाटील इस्टेट, शिवाजीनगर इत्यादी.
लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी झोन मधील संपूर्ण परिसर :- संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावीबाजू , केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कृवडे रोडवरील काही परिसर, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकाराईनगर, मंतरवाडी, ओताडेवाडी .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading