PDFA League Football Tournament – रिअल पुणे युनायटेड, ब्ल्यु स्टॅग एफसी, सिग्मय एफसी संघांची विजयी कामगिरी !
पुणे : पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग’फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल आणि प्रथम श्रेणी गटाच्या सामन्यात रिअल पुणे युनायटेड, ब्ल्यु स्टॅग एफसी आणि सिग्मय एफसी या संघांनी सलग दोन विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली.
एसएसपीएमएस महाविद्यायल फुटबॉल मैदान, संगमपुल येथे असलेल्या या स्पर्धेत रिअल पुणे युनायटेड संघाने सलग दोन विजयांची नोंद केली. पहिल्या सामन्यात रिअल पुणे युनायटेड संघाने न्यु इंडिया क्लबचा ८-० असा धुव्वा उडविला. दुसर्या सामन्यात राहूल खोलेकर, मयांक चर्तुवेदी आणि अभिषेक शिंदे यांच्या गोलांच्या जोरावर रिअल पुणे युनायटेडने चेतक एफसीचा ३-१ असा पराभव केला.
प्रशांत थोरात याच्या गोलाच्या जोरावर ब्ल्यु स्टॅगने चेतक फुटबॉल क्लबचा १-० असा सहज पराभव केला. दुसर्या सामन्यात ब्ल्यु स्टॅगने एफसी बॅकडिनो संघाचा २-० असा पराभव केला. प्रशांत थोरात आणि अंकेश कुमारो यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
सुबोध लांबा, अमोल वालेकर आणि सुमित भंडारी यांच्या गोलांच्या जोरावर सिग्मय एफसीने एफसी बॅकडिनो संघाचा ३-१ असा सहज पराभव केला. दुसर्या सामन्यात सिग्मय एफसीने रेजंहिल्स् यंग बॉईज संघाचा २-१ असा पराभव केला.
