Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

’एसएनबीपी’च्या प्रांगणात रणगाड्याचे लोकार्पण

पुणे ः 1971  च्या भारत-पाक  युद्धामध्ये वापरण्यात आलेला टी – 55 हा रणगाडा एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वाघोली येथील इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात बसविण्यात आला आहे. सैन्य दलातील आधिकारी  इंद्रजित सिंग यांच्या हस्ते नुकतेच शौर्याचे प्रतीक असलेल्या या रणगाड्याचे  तसेच परवीर चक्र विजेत्या जवानांच्या ’वॉल ऑफ फेमचे’लोकार्पण  झाले. यावेळी सैन्यदलातील अन्य आधिकारी तसेच संस्थेचे संस्थापक डॉ. डी. के.भोसले, एस ई सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, संचालिका अँड. ऋतुजा भोसले, देवयानी भोसले, प्राचार्या श्वेता वकिल, जयश्री वेंकटरमण, संस्थेच्या विविध शाखांमधील प्राचार्य,  शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने यापूर्वी विविध उपक्रमांतुन सैन्यदलाप्रती दाखवलेली कृतज्ञता व योगदान या गोष्टी विचारात घेऊन संस्थेला   हा रणगाडा उपलब्ध करून देण्यात आला. संचालिका ऋतुजा भोसले यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी मेजर जनरल इंद्रजीत सिंग यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांचे व कलागुणांचे कौतुक केले.
संस्थापक डॉ. डी. के. भोसले यांनी रणगाडा उपलब्ध करून दिल्याबद्दल संरक्षण विभागाचे आभार मानले. संस्थेच्या वतीने  ऐतिहासिक वारसा असलेल्या या रणगाड्याचे योग्य पध्दतीने जतन व देखभाल केले जाणार असल्याचे  नमूद केले.

सैन्य दलात वापरलेल्या या रणगाड्यामुळे तरुण पिढीला लष्करात सेवा बजावण्यासाठी प्रेरणा  मिळेल. या रणगाड्याच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण सामर्थ्याची ओळख  विद्यार्थ्यांना होणार आहे. हा रणगाडा आमच्या संस्थेच्या प्रांगणात कायम राहणार असल्याने ही बाब आमच्यासाठी सर्वोच्च आनंददायी ठरणार आहे.
 डॉ. डी.के.भोसले ,चेअरमन एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,पुणे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading