Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

युवक मराठा महासंघच्या वतीने शिवजयंती साजरी

पुणे : अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे व श्री सदाशिव पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री शिवाजी मंदिर यांच्या तर्फे १९ फ्रेबुवारी रोजी सदाशिव पेठ येथील श्री छत्रपती शिवाजी मंदिर सदाशिव पेठ येथे ३९२ शिवजयंती साजरी केली यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस समिती सरचिटणीस रोहित टिळक व मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नामदेवराव मानकर, पुणे युवक अध्यक्ष युवराज दिसले, निंबाळकर तालीम गणपती मंडळाचे पवार साहेब , राष्ट्रवादी कॉग्रेस कसबा मतदार संघ कार्याध्यक्ष दिपक पोकळे इ. मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्रजी कोंढरे यांच्या संकल्पनेतुन भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराज कॅलेडर,व मराठा पुस्तीका असे देऊन शिवराय मनामनात शिवजंयती घराघरात हा उपक्रम संपुर्ण पुण्याशहरातील एक लाख समाज बांधवापर्यंत एक वर्षात देण्याचे ठरविले आहे व प्रत्येक घरात शिवजयंती साजरी व्हावी ही संकल्पना आज पासुन सुरुवात केली. 

ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  रोहित  टिळक यांनी संकल्पनेचे कौतुक केले व पुढील भावी पिढीस उपयुक्त असे मराठा पुस्तिका सर्वांनी वाचले पाहिजे असे सांगितले क्रार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शितोळे, रविंद्र पठारे यांनी केले यावेळी राजेंद्र बलकवडे, संजय मते, अमित कुलकर्णी, नंदकुमार जाधव, रणजित बहिरट, भाग्यश्री बोरकर, स्वप्निल खडके व असंख्य शिवभक्त उपस्थित होते

Leave a Reply