आज पुणे शहरात कोरोनाचे नवीन 225 रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या तीनशे च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 225 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 422 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 59 हजार 134 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 47 हजार 621 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2 तर हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9336 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2हजार 177अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 126 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3592 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
