fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

मुस्लिम धर्मियांच्या वतीने शिवजयंती खीर आणि सरबत वाटून उत्साहात साजरी

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वधर्मीय मोठ्या उत्साहाने साजरी करतात. पुण्यातही एकात्मतेचा संदेश देत मोमीनपुरा येथील राजे सुलतान फ्रेंड्स सर्कलच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

यंदाही शिवजयंतीच्या निमित्ताने खीर आणि सरबतचे वाटप करण्यात आले आहे.दरवर्षी या राजे सुलतान फ्रेंड्स सर्कल संस्थापक तौसिफ चिंधीवाला,आणि अध्यक्ष जावेद खान यांच्यावतीने शिवजयंतीच्यानिमित्ताने विविध स्पर्धा, व्याख्यान, तसेच समाजप्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.अशी माहिती यावेळी सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading