fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

पुणे मनपा निवडणुकीसाठी भाजपाची प्रचारात आघाडी- चंद्रकांत पाटील

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नव्याने समाविष्ट गावात झंझावाती प्राचार

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलं असून, भाजपाने निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गेल्याच आठवड्यातील वाघोली आणि मांजरीतील प्रचारानंतर आज पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या हवेली तालुक्यातील गावांचा दौरा करुन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तसेच विरोधकांना ५० विरुद्ध पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडण्याचे आव्हान दिले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी हवेली तालुक्यातील पिसोळी, उंड्री, वडाची वाडी, औतडेवाडी, हांडे वाडी, शेवाळेवाडी, होळकर वाडी, उरळी देवाची, उरळी फाटा, भेकराईनगर आणि फुरसुंगी गावाचा दौरा करुन मतदारांशी संवाद साधला.

हांडेवाडी येथील कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने कोणत्या निकषांवर महापालिकेत २३ गावांच्या समावेश करण्याचा निर्णय घेतला माहिती नाही. हम करे सो कायदा तत्वाने जुन्या प्रभागांची मोडतोड करत, नवी प्रभाग रचना केली. पण तरीही महापालिकेत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल.”

राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देताना पाटील म्हणाले की, “महापालिकेत भाजपाची सत्तेमुळेच ११ हजार कोटीचा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहाणी दौरे आणि उद्घाटने करत आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान आहे की, त्यांनी आणि आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन त्यांनी आपली सत्ता असताना ५० वर्षांच्या काळात काय काय केलं हे जनतेसमोर मांडावं. आम्ही पाच वर्षांचा हिशेब जनतेसमोर मांडू.”

यावेळी भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पंडितदादा मोडक, दादासाहेब सातव, नगरसेवक मारुती (आबा) तुपे, संजय घुले, रोहिदास शेठ उंदरे, संदीप लोणकर, राहुल शेवाळे, रणजित रासकर, केशव कामठे, अभिजीत खराडे, आकाश पवार, शोभाताई लागड,‌ जीवनराव जाधव, संदीप हरपळे, धनंजय कामठे, वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे, वैशाली पवार, पांडुरंग रोडे, मंगेश जाधव, विजया वाडकर, स्वाती कुरणे, झांबरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading