Friday, June 5, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

‘कच्चा बादाम… ‘ गाण्या मागचा खरा चेहरा; आजही राहातोय झोपडीवजा घरात

जगभर सर्वत्र धुमाकूळ घालत असलेले आणि अनेक सेलिब्रिटींना आपल्या तालावर थिरकवायला लावणारे गाणे म्हणजे ‘कच्चा बादाम…’. जगभर हे गाण वाजतय, अनेकांनी याचे मीम्स बनवले, रील  बनवले अगदी रीमिक्स ही बनवले. पण हे गाण कोणी लिहीलं? यांचा संगीतकार कोण? किंवा अगदी या गाण्याचा मूळ गायक कोण आहे? याची बहुतांश लोकांना कल्पनाही नाही. तर जाणून घेऊया ‘कच्चा बादाम… च्या मूळ गायकाबद्दल.

या गाण्याचा लेखक, गायक, संगीतकार हा कोणी प्रशिक्षित व्यक्ती नसून पश्चिम बंगाल मधील भूईमुगाच्या शेंगा व शेंगदाणा विकणारा आणि झोपडीवजा घरात राहणारा एक सामान्य विक्रेता आहे. भूबन बडयाकर (Bhuban Badyakar)असं त्याच नाव. त्यांच्याकडील भूईमुगाच्या शेंगा लोकांनी विकत घ्याव्यात म्हणून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तो हे गाण गात असे. त्यांच्या या युक्तीने त्याने अनेकांच लक्ष वेधून घेतलं. तो जेथे जात तेथे त्याला ग्राहक हे गाण म्हणण्यास सांगत सांगायचे. अनेकांनी हे शूट करून  सोशल मिडियावर आपलोड केलं. अल्पावधीतच हे गाण लोकप्रिय झालं. पण हे भूबन बडयाकर यांना वगळून करण्यात आलं. कोणीही त्यांना या गाण्याच क्रेडीट दिल नाही. जेव्हा त्यांना हे कळाल तेव्हा त्यांनी पोलिसांत या विषयी तक्रार नोंदवली.

त्यानंतर अनेकांनी त्यांच्या सोबत गाणी बनवली; सेल्फी काढले; अगदी अलीकडेच पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांनी देखील भूबन यांना कार्यालयात बोलावून यांचा सत्कार केला. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान, गायक – संगीतकार हिमेश रेशमिया, कोरियोग्राफर गणेश आचार्य, मराठीतील स्टार सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री अक्षया देवधर, कॉमेडियन आदर्श आनंद पासून जगभरातील अनेकांनी भूबन यांचे कौतुक केले आहे. भारतासह साऊथ कोरिया, टांझानिया, अमेरिका यांसारख्या अनेक देशातील तरूणांच्या ‘कच्चा बादाम’ या गाण्यावरील ‘रील’चा इंस्टाग्रामवर अक्षरशः पाऊस पडतोय. अनेक टीव्ही शोमध्ये त्यांना बोलावण्यात आलं.

 

पण आज जग ज्यांच्या गाण्यावर नाचतयं तो भूबन बडयाकर मात्र एका झोपडीवजा घरात राहातोय. त्यांची आर्थिक परिस्थिती बादललेली नाही. अनेकांनी त्याच्या गाण्यांचे पैसे दिलेले नाहीत. तो आधीही भूईमुगाच्या शेंगा विकत होता अन् आजही विकातोय.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading