fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

PMPML – निगडी ते आळंदी नवीन बसमार्ग सुरू तसेच दोन बसमार्गांचा विस्तार

पुणे : पीएमपीएमएल कडून आजपासून मार्ग क्रमांक ३४० निगडी ते आळंदी हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. तसेच मार्ग क्रमांक २६४ या बसमार्गाचा विस्तार भोसरी ते पाबळगाव असा तर मार्ग क्रमांक ३३९ या बसमार्गाचा विस्तार भोसरी संतनगर ते कात्रज असा करण्यात आला. भोसरी येथे संतनगर चौकात आमदार  महेश  लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या हस्ते तिन्ही बसमार्गांचा शुभारंभ करून तिन्ही बससेवांचा लोकार्पण सोहळा पार पडला. 

याप्रसंगी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, निगडी डेपो मॅनेजर शांताराम वाघेरे, भोसरी डेपो मॅनेजर रमेश चव्हाण, भोसरी टर्मिनल प्रमुख काळूराम लांडगे, कुंदन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. योगेश लांडगे, शिवराज लांडगे यांनी या बससेवेसाठी पाठपुरावा केला.

मार्ग क्रमांक २६४ – भोसरी ते पाबळ गाव या बससेवेचा मार्ग भोसरी, मॅगझीन चौक, चऱ्होली फाटा, आळंदी, वडगाव घेनंद, शेलगाव फाटा, शेलपिंपळगाव, बहुळ फाटा, साबळेवाडी, चौफुला, केंदुर, थिटेवाडी, पाबळ गाव असा असणार आहे. भोसरी ते पाबळ गाव पहिली बस सकाळी ६.०० वा. तर शेवटची बस रात्री ७.४५ वा. आहे. तसेच पाबळगाव ते भोसरी पहिली बस सकाळी ६.४० वा. तर शेवटची बस रात्री ८.३० वा. आहे.

मार्ग क्रमांक ३३९ – भोसरी संतनगर ते कात्रज या बस सेवेचा मार्ग भोसरी संतनगर, भोसरी, नाशिक फाटा, वाकडेवाडी, शिवाजीनगर, डेक्कन, टिळक रोड, स्वारगेट, कात्रज गुजरवाडी फाटा असा असणार आहे. भोसरी संतनगर ते कात्रज पहिली बस सकाळी ५.४५ वा. तर शेवटची बस रात्री ८.०० वा. आहे. तसेच कात्रज ते भोसरी संतनगर पहिली बस सकाळी ७.३० वा. तर शेवटची बस रात्री ८.०० वा. आहे. मार्ग क्रमांक ३४० – निगडी ते आळंदी या बससेवेचा मार्ग निगडी, यमुनानगर, थरमॅक्स चौक, कृष्णानगर, घरकुल, जाधववाडी, वडमुखवाडी, चऱ्होली फाटा, काटे वस्ती, देहू रोड, आळंदी असा असणार आहे. निगडी ते आळंदी पहिली बस सकाळी ६.१० वा. तर शेवटची बस रात्री ८.५० वा. आहे. तसेच आळंदी ते निगडी पहिली बस सकाळी ६.५५ वा. तर शेवटची बस रात्री १०.०० वा. आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading