Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेच्या प्रभाग आराखडा हरकतीवर 24 फेब्रुवारीला सुनावणी


पुणे: आराखड्यांच्या प्रसिद्धीनंतर त्यावर हरकती तसेच सूचना नोंदवण्यासही सांगण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत पुणे महापालिकेच्या प्रभागांसाठी 3 हजार 596 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. लवकर या हरकतींवर सुनावणी केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियमावली घालून दिली आहे. नोंदवण्यात आलेल्या हरकती व सुचंनावर सुनावणी करताना त्याचे वरागीकरण केले जाणार आहे. त्यानुसार ज्या सूचना एकासारख्य आहेत त्याची सुनावणी स्वतंत्रपणे न करता, त्यावर गटागटाने सुनावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं सूचना दिल्या आहेत.

महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यावर नागरिक, राजकीय पक्ष यांच्या हरकती व सूचना मागवन्यात आलया. या हरकती व सूचनांवर निष्पक्षपातीपणे सुनावणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यशदाचे महासंचालक एस. चोक्‍कलिंगम यांची नियुक्ती केली आहे. येत्या 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

महानगरपालिकेतील सूचना व हरकतीचा अहवाल 2 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला पाठवायचा आहे. प्रत्येक हरकतीची स्वतंत्र सुनावणी घेतल्यास मुदतीत हे काम होणार नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी एक प्रकारच्या अथवा काही विशिष्ट प्रभागांशी संबंधित विविध व्यक्तींकडून हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. अशा हरकतदारांची मागणी एक प्रकारची असल्यास, त्या सर्व हरकतदारांचा एक गट करून सुनावणी घ्यावी असे आदेश आयोगाने दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading