महापालिकेत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी – राष्ट्रवादीचे एसीबीला निवेदन
पुणे : महापालिकेच्या काही प्रॉपर्टीस त्या सत्ताधारी नगरसेवकाने काही कंपन्यांना दिले जाणार आहेत या बाबत आमचा आक्षेप आहे. या माध्यमातून सत्ताधारी भाजपच ही पालिकेवर आणि पुणेकरांनावर वर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप प्रशांत जगताप यांनी काल सत्ताधार्यां भाजप वर केला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे महानगरपालिकेत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी एसीबी कार्यालयात निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, नगरसेवक सुभाष जगताप व पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. प्रशांत जगताप यांनी एसीबी कार्यालयाला निवेदन देऊन आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
प्रशांत जगताप म्हणाले, मागील पाच ते सहा महिन्यामध्ये स्थायी समितीमध्ये जवळपास 11 हजार कोटींची विषय मंजुर झाले आहेत.हे केवळ आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणले गेले आहे.आपली सत्ता पुन्हा येणार नाही.हे दिसत असल्याने हजारो कोट्यवधी रुपयांचे विषय आणले गेले आहे.यामुळे पुणेकर नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केले आहे.ही निषेधार्थ बाब असून आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो.या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असून त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
