एलपीएफ चे संस्थापक विश्वस्त फिरोज पूनावाला यांच्यांतर्फे शाळकरी मुलींना सायकल भेट
पुणे: शाळेपासुन दूर राहणार्या व गरजू कुटुंबातील शाळकरी मुलींचे शिक्षण सुखकर व्हावे, शाळेसाठी दुर प्रवास करण्यात त्यांना अडथळे येऊ नए व मुलींनी शाळा सोडू नये या उद्येश्यातुन लीला पुनावाला फाउंडेशन चे संस्थापक विश्वस्त फिरोज पुनावाला यांनी शाळकरी मुलींना सायकली भेट दिल्या. याचसोबत त्यांनी अन्य आवश्यक भेटवस्तु देखील वितरीत केल्या.
चांदोली, गावडेवाडी, खडकी आणि पिंपळगाव येथील एलपीएफ तर्फे समर्थित शाळांमध्ये शिकणार्या लिला ज्युनियर्सला या भेटवस्तू भेट देण्यात आल्या. शालेय प्रकल्प – ‘टूमारो टूगेदर’, अंतर्गत फिरोज पुनावाला यांनी शाळेपासून दूर अंतरावर राहणाऱ्या लिला ज्युनिअर्सना ( फाउंडेशनकडृन शिष्यवृत्ती मिळवणार्या मुली) ८९ सायकली भेट दिल्या. सायकली भेट स्वरूपात देण्यामागील उद्येश्य हा होता की या मुलींचा प्रवास सोपा व्हावा जेणेकरून त्यांच्या शिक्षणात बाधा येऊ नये. सायकलीशिवाय फिरोज पुनावाला यांनी २१२ गणवेश, १०६ शालेय दप्तरे, २० टैब,, १०६ शूज, २१२ जोड्या मोजे आणि १७४ एलपीएफ जर्नल्स देखील लिला ज्युनियर्सना भेट म्हणून दिले.
फिरोज पुनावाला एलपीएफ समर्थित मुली आणि त्यांच्या कुटुंबांना संधी देऊन त्यांच्यासाठी समानतेचे जग निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात. कोवीड काळात कित्येक मुलींचे पालक बेरोजगार झाले आश्या वेळी मानवतेच्या दृष्टीकोणातुन फिरोज पुनावाला यांनी लिला ज्युनियर्सच्या कुटुंबांसाठी अणेकदा कोविड – १९ चे आवश्यक किट्स, राशन आणि सॅनिटायझर वितरण मोहिमेचे नेतृत्व केले आहे. या परोपकारी प्रयत्नांबद्दल बोलताना फिरोज पुनावाला म्हणाले, “लिला ज्युनिअर्ससाठी सायकल वाटप मोहिमेचे नेतृत्व करणे महत्त्वाचे होते, कारण मुली त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी खूप जास्त मेहनत करतात. शाळेसाठी दुरवरचा प्रवास अणेकदा त्यांच्या शैक्षणिक जीवनात अडथळा निर्माण करतो. मला आनंद आहे की एलपीएफ अशा उपक्रमांद्वारे या मुलींना त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण सोडू नये यासाठी त्यांना मदत करण्यास सक्षम आहे.
