Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अभिवादन

पुणे : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवशंभूनगर येथील गुरु रविदास महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त उमेश सोनवणे, नगरसेवक प्रकाश कदम, अखिल भारतीय रविदाशिया धर्म संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, रतनलालजी सोनाग्रा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले, तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading