Friday, June 5, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

लाल किल्ला हिंसा प्रकरणात चर्चेत आलेल्या पंजाबी कलाकार दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू

नवी दिल्ली : पंजाबी कलाकार दीप सिद्धू याचा मंगळवारी सोनिपत, हरियाणा येथे एका कार अपघातात मृत्यू झाला आहे. किसान आंदोलनावेळी दीप सिद्धू हा चर्चेत आला होता. आपघाता वेळी तो आपल्या कारमधून मित्रांसोबत दिल्लीवरून पंजाबला जात होता. यावेळी कुंडली बॉर्डरजवळ त्याच्या कारची आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात त्याचा जागीच मृ्त्यू झाला आहे. या अपघातानंतर दीप सिद्धू याचा मृतदेह खरसौदा रुग्मलयामध्ये ठेवण्यात आला आहे. या अपघाताची माहिती मिळताच दीप सिद्धूच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या निधनामुळे दुःख व्यक्त केला आहे.

दीप सिद्धू हा किसान आंदोलनावेळी चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणात त्याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading