fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

विविध पुरस्कार पटकावणाऱ्या ‘जिंदगानी’चे शो हाऊसफुल्ल

सामाजिक बांधिलकी आणि निसर्गावर आधारित असलेला ‘जिंदगानी’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. लॉकडाऊन नंतर मराठी चित्रपटसृष्टी पूर्वपदावर येत असताना मराठी चित्रपटाला रसिकांनी सुखद धक्का दिला आहे. रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन पत्रकारांसाठी व चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसाठी केले होते. या चित्रपटातून वैष्णवी शिंदे हिने पदार्पण केले असून कार्यकारी निर्माता महेश क्षिरसागर हे आहेत.

या प्रसंगी अभिनेता रोहन पाटील, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, संतोष कुमार, निर्माते गोवर्धन दोलताडे आणि चित्रपटातील कलाकार तसेच पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजी दोलताडे म्हणाले की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे पुरस्कार मिळवले असून क्राउन वूड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे.

निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की “या चित्रपटाची कथा ही एका गावाची आणि तिथल्या गावकऱ्यांची कथा असून त्यांच्या संघर्षाची आहे. यातून निसर्गाचं जे शोषण मानव कळत नकळत करतो त्याबद्दल भाष्य हा चित्रपट करतो. मानवी भावनांचं भावविश्व सांगणाऱ्या ‘जिंदगानी’चे दिग्दर्शन आणि लेखन विनायक साळवे यांनी केले आहे तर सुनीता शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading