Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

फेरफार अदालतीमध्ये साडे तीन हजार फेरफार नोंदी निर्गत

पुणे : महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये ३ हजार ५५४ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. यात २७५७ साध्या, ६७१ वारस आणि १२६ तक्रारींचा समावेश आहे.

नोंदी निर्गत करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी प्रत्येक तालुक्याच्या मंडळ मुख्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. हवेली तालुक्यात ४८२, पुणे शहर २२, पिंपरी चिंचवड १०१, शिरुर ४७१, आंबेगाव १०४ , जुन्नर ३२०, बारामती ६१३, इंदापूर २५८, मावळ १७७, मुळशी ५२, भोर ९४, वेल्हा ६७, दौंड २४४, पुरंदर २०७ आणि खेड तालुक्यातील ३४२ नोंदी निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती कुळकायदा शाखेचे तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading