येरवडा परिसरात घडलेल्या दुर्घटना प्रकरणी विकासकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा -बसपाची मागणी
पुणे: येरवडा परिसरातील वाडिया स्टड फार्म जवळ इमारत दुर्घटनेमध्ये उत्तर भारतीय कामगारांच्या मोठ्या संख्येने मृत्यू झालेल्या आहे. बसपाचे शिष्टमंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली दुर्घटनाग्रस्त घडलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती मिळालेल्या माहितीमध्ये कामगारांची कुठल्याही प्रकारची सुरक्षा नव्हती.
बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली नव्हती . अनधिकृत रित्या बांधकाम करण्यात येत असल्याचे दिसून आले . विकासकाच्या अक्षम चुकीमुळे उत्तर भारतीय मजुरांचा जीव गमवावा लागला आहे. बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करण्यासाठी कोणीही नव्हते ही अतिशय माणुसकीला काळिमा फासण्याची घटना घडलेली आहे याला सर्वस्वी बांधकाम विकासक , मनपा संबंधित कर्मचारी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर इत्यादी जबाबदार आहेत तरी मुख्य बांधकाम विकासकावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन बसपाच्या वतीने देण्यात आले यावेळी घटनास्थळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीप जी गायकवाड ,प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे ,जिल्हा प्रभारी रमेश गायकवाड ,सागर खंडे महंमद शफी ,सुनील गवळी, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष संदीप कांबळे ,महासचिव राहुल बोडदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते
