Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लता दीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू; पंतप्रधानांनकडून तब्येतीची विचारपुस

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. संपूर्ण देशभर यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लता दिदींसाठी देवाकडे प्रार्थना करत  आहेत. शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर  कुटुंबीयांना हा निरोप पाठवला आहे.

पीयूष गोयल शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात लता दिदींना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मंगेशकर कुटूंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “लता दीदींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत”, असा पंतप्रधानाचा संदेश त्यांना दिला.

दरम्यान, शनिवारी दिवसभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मधुर भांडारकर, आशा भोसले, आदित्य ठाकरे, रश्मि ठाकरे आणि श्रद्धा कपूर आदींनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची चौकशी केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading