एनएसयुआय कडून हुतात्मा कर्णिकांना अभिवादन
पुणे : ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान पुण्यातील ‘कॅपिटॉल’ चित्रपटगृह बॉम्बस्फोटात (1943) भास्कर कर्णिक यांचा सहभाग होता.
भास्कर कर्णिक पुणे येथील देहू रोड ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस होते. जेवण्याच्या डब्यातून ते बॉम्ब घेऊन येत. ते तांबडी जोगेश्वरी मंदिरात ठेवण्यात आले. मंदिराचे पुजारी भालचंद्र बेंद्रे,व इतर काही लोक त्यांचे सहकारी होते.
त्यांनी 24 जानेवारी 1943 रोजी कॅम्प मधील ‘कॅपिटॉल’ चित्रपटगृहात बॉम्बचा वापर केला.
हुतात्मा कर्णिक व त्यांच्या काही सहकाऱ्यांना 31 जानेवारी 1943 ला अटक झाली. फरासखाना पोलीस स्टेशन ला त्यांना आणले गेले तेव्हा पोलीस स्टेशन परिसरात त्यांनी 31 जानेवारी 1943 रोजी साइनाडची पूड खाल्ली. आणि ते शहीद झाले. त्याच परिसरात त्यांचे स्मारक उभे आहे.
काँग्रेसची विद्यार्थी संघटना ‘एनएसयुआय’ ने जोगेश्वरी मंदिर ते कर्णिक स्मारक अशी अभिवादन फेरी काढली. स्मारकाच्या ठिकाणी हुतात्मा कर्णिक यांना अभिवादन केले. जोगेश्वरी मंदिराचे पुजारी स्वातंत्र्यसैनिक भालचंन्द्र बेंद्रे यांच्या वारसांचा सन्मान केला गेला.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे एसएसयुआय सहप्रभारी भाऊसाहेब आजबे, प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, शहराध्यक्ष भूषण रानभरे, प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व सन्मानाचे कार्यक्रम एनएसयुआय कडे राबविले जाणार आहेत असे भाऊसाहेब आजबे यांनी सांगितले.
