Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांचा विरोध;  पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : दहावी आणि बारावीच्या  ऑफलाईन परीक्षांना  विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. पुण्यात  विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे.

पुण्यात राज्य शिक्षण महामंडळास समोर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. आंदोलन रमेश सातपुते , सचिन कुमार, राहुल टेकाळे या  विद्यार्थ्यांनी केले आहे.
रमेश सातपुते म्हणाले, वर्षभर ऑनलाइन शिकवलं तर मग परीक्षाही ऑनलाईन घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशी मागणी आमची मागणी आहे म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत. असे रमेश सातपुते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading