सलमान, तुला मी सुपरस्टार होऊन दाखवतोच – अभिजित बीचुकले
पुणे : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान व बिग बॉस स्पर्धक अभिजित बीचुकले यांच्यात बिग बॉस मध्ये भांडणे झाली. त्यामुळे बिग बॉस मधून बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकलेने सलमान खान विरोधात वक्तव्य करायला सुरूवात केली आहे. आजही पुण्यात पत्रकार परिषद घेवून बिचुकलेने सलमानला ‘चॅलेंज’ केलं आहे. ” सलमान असे किती आले आणि किती गेले. पण सलमान तुला मी सुपरस्टार होऊन दाखवतोच”, अस वक्तव्य बिचुकलेने केल आहे.
अभिजित बीचुकले म्हणाले, माझी काही विधानं बिग बॉस ने दाखवले नाही. मी देव देवतांना मानणारा माणूस आहे. प्रभू अंगद आमचे बाप आहेत हे मी म्हणालो, बिग बॉसने आम्हाला सांगितलं की यावर बोलू नका. सलमानला मी सांगतो तुझ्या कुत्रा, कुत्रींना थांबव. खान नावाचा घमेंड असेल तर तू अफजल खान अशील मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे. मी कोथळा बाहेर काढेल, अशी धमकी अभिजित बीचुकले यांनी सलमान खानला दिली.
बिग बॉसच्या शोमध्ये सलमान खान तुम्ही गांजा पिऊन बोलत होता का? असाही सवाल अभिजित बीचुकले यांनी सलमान खानला उपस्थित केला. सलमान खानला शमिताला विनर करायचा होतं म्हनून हे सगळ झालं. सलमान असे किती आले आणि किती गेले. मी प्रोडक्शन हॉस घेऊन येतोया पिक्चर काढतोय. सलमान तुला मी सुपरस्टार होऊन दाखवतो, असे आव्हानअभिजित बीचुकले सलमान खानला केले.
