Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने करण्तयात आले डॉ प्रभा अत्रे यांचे अभिनंदन

पुणे : किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व त्यांचा पत्नी शिल्पा यांनी प्रभाताईंच्या स्वरमयी गुरुकुल या निवासस्थानी जात त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

किराणा घराण्याचे जगविख्यात गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या १०० व्या जन्मदिवसाचे औचित्य साधत दिनांक ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या ‘अभिवादन’ या विशेष कार्यक्रमाची सांगता डॉ प्रभा अत्रे यांच्या गायनाने होणार आहे हे विशेष.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading