Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्धव ठाकरे यांनी चार्ज तरी दुसऱ्यांना द्यायला हवा होता इतकीच आमची इच्छा होती – चंद्रकांत पाटील

पुणे:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसापासून आजारी आहेत . त्यामुळे ते घराच्या बाहेर पडत नाही . त्यावर मुख्यंमत्री बरे व्हावे हीच आमची इच्छा होती.
चार्ज तरी दुसऱ्यांना द्यायला हवा होता. इतकीच आमची इच्छा होती. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पुण्यतिथी पत्रकार परिषदेत म्हणाले.
या पत्रकार परिषदेला भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक , भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.
आज चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्यावर महा विकास आघाडी सरकार व विरोधी पक्षात वाद सुरू आहे. त्यावर अजित पवारांनी शपथ घेतल्यावर कोर्टाने निर्णय त्यांच्या बाजूने दीला तर कोर्ट चांगल आणि भाजपच्या १२ आमदारांच निलंबन माग घेतल .तर कोर्ट वाईट ही वृत्ती बदलायला हवी. असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

चंद्रकांत पाटील म्हणाले,७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.राज्य घटनेमुळे लोकशाही बळकट झाली आहे .भारत हा एकमेव देश आहे जिथे स्वातंत्र मिळाल्यानंतर लगेचच सर्वांना सर्व अधिकार मिळाले आहेत.घटनेच्या मूळ गाभ्याला बदलण्याचं काम केलं जातं आहे .गेल्या काही दिवसांपासून याच घटनेचा विसर पडत आहेत .असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोरोनाचे रुग्ण हे पुण्यात जास्त सापडायला लागले आहेत. त्यावर पाटील म्हणाले, मुंबई पेक्षा पुण्यात जास्त संसर्ग होत आहे.कोरोना आता घातक नसला तरी काळजी माञ घ्यायलाच हवी. असे चंद्रकांत पाटील म्हणाले .

आज पुण्यात भारतीय जनता पार्टी तर्फे कोरोना हेल्पलाईन संकल्पना चालू केली त्यावर पाटील म्हणाले. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता ही कोरोना हेल्पलाईन सुरू करत आहोत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
जीएसटी हे पैसे केंद्र व राज्य सरकार देणार यावरून दोघात वाद सुरू आहे त्यावर पाटील म्हणाले ,जीए सटी चे पैसे हे gst काऊन्सिल देणार होत केंद्र नाही.
सगळ केंद्राने दिलं तरी दोष तुम्ही केंद्राला देता.
तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का?
खोटं बोल पण रेटून बोल इतकचं हे सरकार करत आहे.तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का?* असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

महानगरपालिकेच्या निवडणुका या कोरोनामुळे पुढे जाणार अशी चर्चा आहे. त्यावर पाटील म्हणाले,आपल्याला कोरोनाच कारण सोडुन इतर कुठल्याच कारणाने निवडणूक पुढे ढकलता येणार नाही.ओबीसी आरक्षणासाठी फक्त दिखावा केला जात आहे.येणारी निवडणूक हे कसे लढणार एकत्र की वेगळे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी ला उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading