Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात अमलीपदार्थाची विक्री करताना नायजेरियन नागरिकाला अटक, लाखोंचे कोकेन जप्त

पुणे :  शहर पोलिसांकडून कोकेन (cocaine seized) विकणाऱ्या नायजेरीयन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मध्यरात्री गस्त घालत असतानाही पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनी 15 लाख 29 हजाराचे कोकेन केलं जप्त केले आहे. 

शहरातील पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना लष्कर परिसरात नायजेरियन आरोपी तिथे संशयित रित्या फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो घाबरला व तिथून निघून जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता अंमली पदार्थाच्या विक्री करत असल्याची माहिती समोर आली. चिकवू रेऊबेन असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईमधून पुण्यात कोकोनची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती त्याने दिली आहे.

पुणे शहर पोलिस गेल्याकाही दिवसांपासून पुण्यात बेकायदेशीररित्या अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यावर पोलिसांची नजर आहे. या अंतर्गत ठिकठिकाणी छापेमारी करत पोलिस कारवाई करत आहे. काल मध्यरात्री पकडण्यात आलेल्या आरोपीकडेही पोलीस तपास करत आहे .आरोपीकडून आणखी काही माहिती मिळतेय का याचा तपासही पोलीस करत आहेत.

Leave a Reply