ढगाळ वातावरणामुळे उद्या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यांत पावसाच्या हलक्या सरी बसरत आहेत. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे उद्या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि राज्यातील काही भागांत सकाळी ९.४५ मिनिटांनी ढगाळ वातावरण तयार झाले होते. तसेच पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी सुद्धा बरसल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग, गोवा, ठाणे आणि पुणे शहरांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी आणि रविवारी मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी यला मिळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असल्याचं चित्र आहे. परंतु उद्या राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, काल(शनिवार) राज्यांत मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र, उद्या पुणे, उत्तर कोकण , भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
