Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

राहुल देशपांडे, दीप्ती माटे यांनी जिंकली रसिकांची मने

पुणे : प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि दीप्ती माटे या भावंडांनी शनिवारी सादर केलेल्या ‘राहुल देशपांडे कलेटिव्ह’ या लाईट म्युझिकवरील कार्यक्रमाने पुणेकर रसिकांची मने जिंकली.

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या वतीने आणि गोखले कन्सट्रक्शन्सच्या सहकार्याने स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा येथे आयोजित १५ व्या वसंतोत्सवात तिस-या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये राहुल देशपांडे, दीप्ती माटे, संजॉय (गिटार), ओजस अधिये (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), अनय गाडगीळ, अभिजित भदे (ड्रमसेट) आणि मनीष कुलकर्णी (बास गिटार), अतुल रनिंगा (की बोर्ड), आदी कलाकारांचा समावेश होता.

‘सुंदर ते ध्यान…’ या भजनाने राहुल देशपांडे यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘मुद्दत हुई है…’ ही गझल पेश केली. यानंतर दीप्ती माटे यांनी ‘आपकी याद आती रही रात भर…’, ‘सलोना सा साजन…’, या रचना सादर करत रसिकांची वाह वाह मिळविली. त्यांनी गायलेल्या ‘आज जाने की जिद ना करो…’ या ठुमरीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर राहुल देशपांडे यांने सादर केलेल्या ‘सांज ढले गगन तले…’, ‘तोच चंद्रमा नभात…’, ‘सूर से सजी संगिनी…’ या रचनांनी उपस्थितांच्या काळजाचा ठेका चुकवला.

या आधी पं. रघुनंदन पणशीकर यांचे शिष्य सौरभ काडगांवकर यांचे गायन झाले. त्यांनी राग भीमपलासने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी विलंबित तीनताल व मध्यलयीतील बंदिश सादर केली. त्यांनी सादर केलेल्या ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यपदाने उपस्थितांची वाहवा मिळविल. ‘बोलावा विठ्ठल’ या अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. ओजस अधिया (तबला),  मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), अभिषेक ढिले ओम चव्हाण (तानपुरा) यांनी यावेळी साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading