Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

रक्तदान ही काळाची गरज – चंद्रकांत पाटील

पुणे:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, रक्ताची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि मातोश्री जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन विचाधाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक अॅड. योगेश मोकाटे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नवनाथ जाधव, शिवसेनेचे प्रशांत बधे, किरण साळी, नंदू घाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत, अनेक रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांतून येत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी रक्तदान ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काही रक्तदात्यांचे पाटील यांनी अभिनंदन करुन, प्रमाणपत्र ही प्रदान केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading