PMPML – पुणे स्टेशन डेपोत इलेक्ट्रिक चाजिंग स्टेशन
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) पुणे स्टेशन येथील डेपोत विद्युत विषयक विविध कामे करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन येथील डेपोत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला विद्युत पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. पुढील तीन महिन्यांत ही काम पूर्ण होणे अपेक्षित आहेत.
