fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRA

Parbhani -नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपचे निवेदन

परभणी : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा व मारण्याची धमकी देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन परभणी भाजपा महानगरच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, मा.पोलीस अधिक्षक व नवा मोंढा पोलीस स्टेशनला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे सार्वजनिकरीत्या जनतेशी संवाद साधताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल “मी मोदीला मारू शकतो,शिव्याही देऊ शकतो” अशा प्रकारचे भावना भडकवणारे वक्तव्य करून देशवासीयांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. भारतीय संविधानातील सर्वाच्च पदावर असणारे मा. प्रधानमंत्री यांच्या बद्दल असे वक्तव्य करणे व त्यांना मारण्याची धमकी देणे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सखोल चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देताना परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके,मोहन कुलकर्णी,भाजपा मनपा गटनेत्या मंगल मुदगलकर,मनपा सदस्य मोकिंद खिल्लारे, सरचिटणीस संजय रिझवानी, दिनेश नरवाडकर, एस.एस.इनामदार, अंकुश आवरगंड, उपाध्यक्ष अब्दुल खालेद, चिटणीस संतोष जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश शेळके,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा  सुप्रिया कुलकर्णी, कामगार आघाडी संयोजक रोहित जगदाळे, युवती मोर्चा संयोजिका  गीतांजली सूर्यवंशी, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी,अरुण कदम,संदीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading