Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

१५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण केंद्र सुरु करा – विशाल वाकडकर

पिंपरी : कोरोना महामारीचा संपूर्ण देशात अनेक राज्यांसह शहरातील नागरिकांना सामना करावा लागत आहे त्यात आता कोरोनाची तिसरी लाट उफाळून आली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला . दि. ३ जानेवारी पासून याची अंमलबजावणीही होत आहे. पण वेगाने लसीकरण होण्यासाठी शहरातील वाकड भागामध्ये लसीकरण केंद्र असणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने वाकडमधील आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती वाकड येथे १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी विशाल वाकडकर (शहराध्यक्ष: राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा) यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजुभाऊ मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, शहर उपाध्यक्ष संतोष वाघेरे पाटील, शहर सरचिटणीस चेतन फेंगसे आणि अक्षय माछरे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading