मायावती यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जन-कल्याणकारी दिन संपन्न
पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक निवडून आणणे. हेच बहन मायावतीजींच्या वाढदिवसाचे गिफ्ट देऊ. जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी. बहुजन समाज पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावतीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जन-कल्याणकारी दिन समारोह आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुदीप गायकवाड महासचिव महाराष्ट्र प्रदेश, भाऊसाहेब शिंदे सचिव महाराष्ट्र प्रदेश अजित ठोकळे, सचिव महाराष्ट्र प्रदेश,सुरेश गायकवाड सचिव महाराष्ट्र प्रदेश,व प्रमुख उपस्थिती म्हणून रतनलाल सोनग्रा उपस्थित होते. सर्व समाजातील विविध घटकांना यावेळी मदत करण्यात आली वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून सदर समारोह संपन्न झाला. बसपाचे अशोक गायकवाड, रमेश गायकवाड, मेहमूद जकाते, प्रकाश गायकवाड, अँड वैभव चंदनशिवे, महंमद शफी, बाळासाहेब तपासे, श्रीपती चव्हाण, सुबोध कांबळे, प्रशांत डोळस, राजेश बेंगळे विजय मिसळे, मधुकर इंगळे, सुनील गवळी, सुनील चव्हाण, किरण सोनवणे, दशरथ भोसले, राम सोनवणे, पी आर. गायकवाड, रमाकांत खंडे,रवि गायकवाड, सुरज गायकवाड, विद्याताई जाधव, नंदा शिंदे, सुषमा गायकवाड,उपस्थित होते.
