जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य मी अजून ऐकले नाही ऐकल्यावर मी उत्तर देईन – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाला घाबरण्याचे काही काम नाही असे वक्तव्य केले होते त्यावर त्यांचे वक्तव्य मी अजून ऐकले नाही ऐकल्यावर मी उत्तर देईन. असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्रीअजित पवार  पत्रकार परिषदेत म्हणाले.

आज सकाळी राज्यामध्ये टाळेबंदी करणार का या प्रश्नावर ती ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यास त्यावर ती मुख्यमंत्री आदित्य ठाकरे निर्णय घेतील असे  अजित पवार यांनी वक्त्यव केले होते .त्यावर पवार म्हणाले,उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. माझ्या कडून बोलताना चूक झाली .असे अजित पवार म्हणाले.
कालवा समिती ची आज बैठक पार पडली  ,त्यावर पवार म्हणाले,पुण्यात पिण्याच्या पाण्याबाबत आणखी काम करावं लागणार आहे असे अजित पवार म्हणाले.
पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे होणार का नाही हा एक प्रश्न आहे, त्यावर अजित पवार म्हणाले,
विमानतळ होणार म्हणजे होणार तुम्ही काहीही काळजी करू नका.जागेबाबत आता बोलत नाही पण आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घ्याव्या कारण ऑनलाइन घेतलं की कोण ऑनलाइन काय कळत नाही. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: