पुणे शहरात आज दिवसभरात 5 हजार 705 नवीन कोरोना रुग्ण

पुणे : पुणे शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आलेख वर चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 5 हजार 705नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2338रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 54हजार 174 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5लाख  13हजार 131इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 6पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9136जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 31907रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 208रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 19174स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: