न्यायव्यवस्थेस वेठीस धरण्याचा केंद्राचा प्रयत्न – डॉ.अभिजित वैद्य

, संस्थापक आणि राष्ट्रीय प्रमुख, आरोग्य सेना
पुणेः- सर्वात मोठी लोकशाही हा किताब भारताला मिळण्यात लोकशाहीचे चार स्तंभ महत्त्वाचा आधार आहेत. या चार स्तंभांच्या सजग आणि जागरूक भुमिकेमुळेच सर्वात मोठी लोकशाही हा किताब आपण आजवर टिकवून ठेवू शकलो आहे. पंरतू लोकशाहीला पूरक चार स्तंभांपैकी न्याय व्यवस्थेला वेठीस धरुन केंद्र सरकार त्यांचा अजेंडा राबविण्याचा अट्टहास करीत आहे. लोकशाहीची ही मूल्ये लयास जाणार नाहीत आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य देखील आबाधीत राहील ह्यासाठी आरोग्य सेनेचे सैनिक सदैव तत्पर राहतील ह्यात शंका नाही, असे मत आरोग्य सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय प्रमुख डॉ.अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले.
सुगावा प्रकाशनचे दिवगंत प्रा.विलास वाघ यांनी त्यांचे सदाशिव पेठेतील सुगावा प्रकाशनचे कार्यालय आरोग्य सेनच्या पुढील कार्यासाठी दिले,  त्याच्या हस्तांतर समारंभ प्रसंगी डॉ.अभिजित वैद्य बोलत होते. यावेळी उषा वाघ, प्रा. शरद जावडेकर, सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, खजिनदार आशिष आजगावकर, डाॅ. नितीन केतकर, डाॅ. प्राची रावळ, वर्षा गुप्ते, प्रमोद दळवी, अतुल रुणवाल, संतोष जाधव, प्रकाश हगवणे, मनोहर भंडारी, अॅड. संतोष मस्के, हनुमंत बहिरट, संध्या बहिरट, सम्राट शिरवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 डॉ.अभिजित वैद्य म्हणाले की, नैसर्गीक आपत्तीच्या काळात आरोग्य सेनेचे सैनिक धावून जातातच. पंरतू सामाजिक आणि राजकीय आरोग्य सांभाळण्याची देखील जबाबदारी आरोग्य सैनिकांवर आली आहे. संविधानात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून ठेवलेल्या मूल्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता संविधनाद्वारे जपली गेलेली मूल्ये संकाटात आली आहेत.
यावेळी उषा वाघ यांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केले. जिल्हा प्रमुख अतुल रुणवाल यांनी प्रास्तिवाक केले. डाॅ. नितीन केतकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: