व्हायरल संभाव्य प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादीने शिवाजीनगर येथील पुणे सायबर पोलिसांकडे केली तक्रार दाखल 

पुणे : समाज माध्यमांमध्ये पुणे शहराची संभाव्य प्रभाग रचना म्हणून एक आराखडा व्हायरल होत आहे. ही घटना महानगरपालिकेच्या अंतर्गत कामकाजाच्या गोपनीयतेचा भंग आहे. याची तात्काळ दखल घेवून व्हायरल संभाव्य प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादीने शिवाजीनगर येथील पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

याबाबाद अधिक माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आम्हाला माध्यमांमधून व पुणे महापालिकेच्या वर्तुळातून समजले. मात्र काही राजकीय मंडळी यामध्ये जाणीवपूर्वक  हस्तक्षेप करीत आहेत. किंबहुना त्यामध्ये अफवा पसरविण्याच्या प्रयत्न होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात पुणे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना सायंकाळपासून समाज माध्यमांमध्ये पुणे शहराची संभाव्य प्रभाग रचना म्हणून एक आराखडा व्हायरल झाला आहे. ही घटना महानगरपालिकेच्या अंतर्गत कामकाजाच्या गोपनीयतेचा भंग आहे. यामागे कुठली व्यक्ती अथवा संघटना आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून या संदर्भामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पुणे सायबर पोलिसांकडे आम्ही आज सायंकाळी तक्रार दाखल केली आहे.

प्रशांत जगताप म्हणाले ,हा नकाशा कुणाच्या माध्यमातून तयार करण्यात आला, तसेच हा नकाशा कोणी समाज माध्यमांवर व्हायरल केला यासंबंधी व्यक्ती व संघटना यांचा कसून शोध घ्यावा अशी मागणी आम्ही पुणे सायबर पोलिसांकडे केली आहे. पुणे सायबर पोलिस या गोष्टीचा सखोल तपास करतील व संबंधित आरोपीस वर कारवाई करतील,असा आम्हाला विश्वास आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: