पुणे ‘शैक्षणिक हब’ होण्यात काँग्रेस काळात उभारलेल्या संस्था असून भारती विद्यापीठ हे त्याचेच प्रतिक – गोपाळदादा तिवारी

पुणे : पुणे ‘शैक्षणिक हब’ होण्यात काँग्रेस काळात उभारल्या गेलेल्या संस्था व भारती विद्यापीठ हे त्याचेच प्रतिक असून, शिक्षण महर्षि डॅा पतंगरावजी कदम व डॅा विश्वजीत कदम यांचे पुणेकरांसोबत एक प्रकारे ऋणानुबंध आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री स्व वसंतदादा पाटील, स्व यशवंतराव मोहीते यांच्या काळात ऊभारलेल्या संस्थाचे रोप आज वटवृक्ष झाले असल्याचे ऊदगार काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी काढले.

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मॉडेलकॉलोनी चाफेकर नगर येथे गरजू महिलांकारिता मोफत दवाखाना व औषधोपचार केंद्राचे उदघाट्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी आणि पुणे शहर महिला काँग्रेसचे नवनिर्वीचीत अध्यक्ष व नगरसेविका पुजा आनंद यांच्या हस्ते झाले. मॉडेल कॉलनी परिसर महिला उत्कर्ष संस्थेमार्फत मोफत विविध प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना (पुणे शहर काँग्रेस चे सरचिटणीस संजय विठ्ठल मोरे व मॅाडेल कॅालनी परिसर महिला उत्कर्ष संस्थे तर्फे) प्रमाणपत्रे देण्यात आली. सदरचे आरोग्य केंद्र संजय मोरे यांचे कार्यालयातील तळमजल्यावरील जागेत सुरू करण्यात आले असुन गरजूंना मोफत ऊपचार देण्यात येणार असल्याचे मोरे कुटुंबियांनी या वेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी नगरसेवक दत्ता बहिरट, काँग्रेस महिला संघटक ऍड. राजश्री अडसूळ, संगीता रुपटक्के, नीता शिंदे, पौर्णिमा भगत, सोशल मीडियाचे गुलाम हुसेन, भारत पवार ,आशुतोष जाधव, संजय धोत्रे, बंडू चव्हाण, बाबा सय्यद, गणेश गुगळे, शिवा हुले तसेच इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेसलीगल सेलचे उपाध्यक्ष ऍड. फैयाज शेख यांनी तर आभार प्रदर्शन विक्रांत धोत्रे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: