राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना महापौर व उपमहापौर यांच्याकडून अभिवादन
पुणे : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना आज जयंतीनिमित्त लालमहल येथे समस्त पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ व उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अनेक मान्यवर सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, राजमाता जिजाऊ माँसाहेबांची शिकवण आजही आपल्या सर्वांना प्रेरणादायी आणि लढण्याची ताकद देणारी आहे. आज त्याच्या जयंतीनिमित्त समस्त पुणेकरांच्या वतीने आम्ही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत आहोत असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
सुनिता वाडेकर म्हणाल्या,आज राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती ज्यांनी जिवंत असताना खूप चांगले काम केले आहे, असे सुनिता वाडेकर म्हणाल्या.
