Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

“कायदा आणि संगीत” विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

पुणे: मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय व पुणे ललित कला केंद्र गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कायदा आणि संगीत’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. १७ आणि १८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दृकश्राव्य (झूम) पद्धतीने होईल अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक प्रतीक सलगर आणि डॉ.अश्विनी इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या दोन दिवसीय चर्चा सत्रात भारतीय संगीताचा कायद्याशी असलेल्या संबंधाविषयी विविध मान्यवरांची व्याख्याने होणार असून उदघाटन समारंभासाठी प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर उपस्थित राहणार असून पद्मश्री शुभा मदगुल, प्रख्यात तबलावादक अनिश प्रधान चर्चासत्रात सहभागी होणार आहेत अशी माहिती प्राचार्या डॉ. क्रांती देशमुख यांनी दिली.

संगीत व कायदा क्षेत्रातील विद्यार्थी आणि संशोधकांसाठी जिज्ञासू रसिकांसाठी चर्चासत्र विनामूल्य असणार असून नोंदणीसाठी समन्वयक प्रतीक सलगर मो. 9420262720 अथवा psalgar@sclc.in या ईमेल वर संपर्क साधावा असे देखील आवाहन यावेळी त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading