जिजाऊंच्या लालमहालात जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला जलाभिषेक व मशालउत्सव
पुणे:राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिजाऊंच्या पुतळ्याला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगडावरील पाण्याने ‘जलाभिषेक’ करण्यात आला. पुण्याची ओळख असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या लाल महालात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वराज्याला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांच्या रूपाने दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता राष्ट्रमाता जिजाऊ.स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या प्रेरणा स्त्रोत असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ. त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लाल महाल येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगडावरील पाण्याने ‘जलाभिषेक’ करण्यात आला.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, अखिल शिवाजीनगर शिवमहोत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन व शिवप्रेमींच्या वतीने ‘लाल महाल’ येथे जलाभिषेक व मशाल उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्याक्ष राजेंद्र दुबल, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, अविनाश मोहूते, राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, तानाजी शिरोळे, बाळू जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदार बहिरट, मुकेश यादव तानाजी शिरोळे यांनी काम केले.
कोव्हिडंच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
